Sunday 30 April 2023

वार्षिक निकाल २०२२-२३

 

निकाल बघण्यासाठी क्लिक करा

👇




            शैक्षणिक वर्ष २०२२-२३ संपलेले असून दरवर्षी १ मे ही निकालाची तारीख असते. याही वर्षी १ मे रोजी वार्षिक निकाल जाहीर होणार होता. परंतु, १ ऐवजी ६ मे रोजी निकाल जाहीर करावा. असे शासन परिपत्रक आल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निकाल / प्रगतीपत्रकांचे वाटप दि.६/५/२०२३ रोजी होणार आहे. १ ते ६ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांची निकालाची उत्सुकता ताणली जाणार आहे. 
        यावर तोडगा काढण्यासाठी मधला मार्ग म्हणून नुकताच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतरिम निकालाप्रमाणे १ मे रोजी आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपणही अंतरिम निकाल जाहीर करावा असा विचार मनात आला. त्यामुळे अल्पकालावधीतच तयारी करून अगदी 10 वी, 12 वी बोर्डाचे निकाल किंवा कॉलेजच्या निकालांसारखा किंवा विविध स्पर्धा परीक्षांच्या ऑनलाईन निकालाप्रमाणे निकाल जाहीर करण्याचा प्रयत्न केला आहे. हा निकाल माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माणिकखांब या शाळेच्या इयत्ता १ ली ते ७ वी मध्ये शिकणाऱ्या एकूण ३८९ विद्यार्थ्यांसाठी  मर्यादित आहे.
          
  • प्रत्येकाच्या निकालाची गोपनीयता अबाधित राहावी यासाठी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्याला आपला जनरल रजिस्टर नंबर टाकावा लागेल.




धन्यवाद !


Sunday 26 February 2023

प्राथमिक शिक्षक बदली - २०२२ (टप्पा क्रमांक ६)

प्राथमिक शिक्षक बदली - २०२२ मधील क्रमांक १ ते ५ टप्पे यापूर्वी अधिकृत पोर्टल वर जाहीर झालेले आहेत. हे सर्व टप्पे संपल्यानंतरही अवघड क्षेत्रामधील काही जागा रिक्त राहिल्या असतील तर त्या जागा १००% भरण्यासाठी सुगम क्षेत्रात १० वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या शिक्षकांमधून त्या जागा भरण्यासाठी पोर्टलवर रिक्त जागांचा तपशील जाहीर करण्यात आलेला आहे. 

या टप्प्यातील पात्र ठरलेल्या शिक्षकांच्या प्रकारानुसार योग्यप्रकारे वर्गवारी करून आपल्या माहितीसाठी कोणकोणत्या शाळांवर जागा रिक्त आहे हे एकाच दृष्टीक्षेपात येण्यासाठी तालुकानिहाय रिक्त जागांचा तपशील देण्यात आलेला आहे. 

शक्यतो या टप्प्यात पोर्टल मार्फतच पदस्थापना होण्याची शक्यता जास्त आहे. परंतु, फॉर्म भरण्याची वेळ आलीच तर ह्या याद्या आपणांस उपयुक्त ठरू शकतात.

यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇

👉 प्राथमिक शिक्षक रिक्त यादी UGT


👉 मुख्याध्यापक रिक्त पदांची यादी HM


👉 गणित-विज्ञान पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.MAths/Sci


👉 भाषा पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.Lang.


👉 सामा.शास्त्र पदवीधर रिक्त पदांची यादी Gr.Tr.Soc/Sci


👉 सर्व रिक्त पदांची एकत्रित यादी


धन्यवाद !

Sunday 29 November 2020

शाळा सुरु होतांना

       


     कोविड-19, कोरोना हे असे शब्द आहेत की, त्यांनी केवळ काही महिन्यांमध्ये सबंध विश्वाला आपली विनाशकारी शक्तीची झलक दाखवून दिली. बस, टॅक्सी, रेल्वे, विमान, हॉटेल्स, लहानमोठे उद्योग, कारखाने, कार्यालये सर्वकाही बंद बंद आणि बंद. सामान्य माणसाला जीवनावश्यक वस्तूंसाठीही घरातून बाहेर पडणे बंद करून टाकले. मोठमोठे उत्सव, सण, समारंभ, लग्न कार्यात होणारी गर्दी सारे काही बंद. एवढंच काय तर अंत्यविधीलासुद्धा वीस पेक्षा जास्त लोकं जमत नाहीत. या सगळ्या गोष्टींवर सरकारला निर्बंध घालावे लागलेत. हे निर्बंध काटेकोरपणे पाळले गेले नसते तर ........ तर नक्कीच आपल्या देशाची, आपल्या राज्याची परिस्थिती आज आहे त्यापेक्षा निश्चितच खूप वेगळी राहिली असती. हे वेगळे सांगायला नको. शासनाने बंद केलेल्या अनेक गोष्टींमध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. ती गोष्ट म्हणजे शाळा. कोरोनाचा प्रभाव जसजसा कमी व्हायला सुरुवात झाली तसतश्या बंद केलेल्या सर्व गोष्टी हळू हळू पूर्वपदावर येवू लागल्यात. मात्र शाळा अजून पूर्वपदावर आल्या नाहीत. दिवाळीनंतर तरी शाळा सुरु होतील असे वाटत होते. पण दिवाळीच्या धामधूमीत आपण थोडे केयरलेस वागलो की काय (कदाचित याला सध्या वाढलेली थंडीही कारणीभूत असावी) पण दिवाळीपूर्वी अगदीच नगण्य होत चाललेले संसंर्गाचे आकडे दिवाळी संपता संपता पुन्हा फुगायला लागलेले दिसून आलेत. आणि त्यामुळे दिवाळीनंतर शाळा उघडेल या आशेवर असलेले विद्यार्थी, पालक, शिक्षक, शासन, शिक्षणप्रेमी, समाज या सर्वांचाच भ्रमनिरास झाला. शासन आणि प्रशासन यांनी शाळा सुरु करण्याची संपूर्ण पूर्वतयारी केलेली असतांना सुद्धा ऐनवेळी शासनाला शाळा सुरु करण्याचा विचार काही काळासाठी पुढे ढकलावा लागला. 

२०२० संपता संपता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल अशी अशा करूया. भारतासह जगभरात कोरोनाच्या लसीवर सुरु असलेल्या युद्धपातळीवरील प्रयत्नांना यश येण्यासाठी विधात्याकडे मन:पूर्वक प्रार्थना करूया. असे जर झाले तर नक्कीच सध्याच्या विराण झालेल्या शाळांच्या इमारतींमध्ये पुन्हा एकदा बालगोपाळांची किलबिल ऐकायला मिळेल. सध्या आत्माविहीन अवस्थेत असलेल्या विद्यामंदिरात विद्यार्थीरूपी आत्मा येईल आणि ओसाड खंडर वाटणाऱ्या शाळेच्या इमारती सरस्वतीची खरीखुरी मंदिरे बनतील. अशी आशा करूया. तोपर्यंत अजून काही दिवस पालकच आपल्या बालकांचे शिक्षक आहेत. पालकांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या अभ्यासविषयक बाबींसाठी आमच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करा. डिजिटल  पॅरेंन्टींगची संकल्पना समजून घेऊन मुलांना अभ्यासात मदत करा. हीच अपेक्षा आहे.

विश्वास ठेवा शाळा लवकरच सुरू होतील आणि यावर्षी मागे राहिलेला अभ्यास पूर्ण करून घेण्याचे प्रामाणिक प्रयत्न शाळांमार्फत नक्कीच केले जातील. तोपर्यंत आपण सर्वजण कोविड-19 चे सर्व नियम पाळूया. शासन आणि प्रशासनाकडून वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करून आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करूया. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' हे कुटुंबातील लहानमोठे सगळ्यांनी कायम लक्षात ठेवा. कोरोनाची लस अजून आलेली नाही, त्यावर परफेक्ट औषधही अजून बाजारात उपलब्ध नाही. मग का म्हणून विषाची परीक्षा बघायची. गेल्या आठ महिन्यांमध्ये जगभरात कोरोनाचे एवढे भयानक तांडव सुरु असतानाही त्याला आपण आपल्यापर्यंत पोहचू दिले नाही. आता तर त्याचा अंत व्हायची वेळ आलेली आहे. मग आता थोड्याकरता तरी त्याला कशाला जवळ येण्याची संधी द्यायची. हत्ती निघून गेला आता फक्त शेपूट बाकी आहे. एवढे लक्षात ठेवा आणि त्यासाठी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.

Friday 24 July 2020

नाशिक शिक्षण हेल्पलाईन

*शिक्षण विभाग, जि.प.नाशिक व स्वयंसेवी संस्था यांच्या प्रयत्नाने शाळा बंद असतांनाही पालक, विद्यार्थी व शिक्षकांना तंत्रशुद्ध शैक्षणिक मार्गदर्शन करण्यासाठी तयार केलेली टेलिग्राम अँप वरील नाशिक शिक्षण हेल्पलाईन जॉईन करण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ.*

https://youtu.be/R4C-3WmMvqc

*हा व्हिडीओ आपल्या विद्यार्थ्यांना/पालकांना पाठवून त्यांनी Telegram app वरील नाशिक शिक्षण हेल्पलाईनला कसे जॉईन व्हावे? यासाठी या व्हिडीओचा आधार घेण्यास सांगावे.*

https://youtu.be/R4C-3WmMvqc

*व्हिडीओ आवडल्यास*
*Like 👍*
*Share ▶️*
*Comment ©️*
आणि *subscribe 🔔* जरूर करावे.🙏🏻😊

धन्यवाद🙏🏻
Raju Morkar (Manikkhamb)

BYJUJ app Information

Save the Children या संस्थेकडून आपल्या शाळेतील स्मार्टफोन वापरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईल क्रमांकावर BYJUJ app रजिस्टर करून मिळणार आहे.

जि.प.शाळा, माणिकखांबची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा